You are currently viewing बैल झुंजी विषया वरून वेंगुर्ला पोलीस ठाण्यात पार पडली पोलिस पाटील यांची बैठक

बैल झुंजी विषया वरून वेंगुर्ला पोलीस ठाण्यात पार पडली पोलिस पाटील यांची बैठक

पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांनी केले मार्गदर्शन

वेंगुर्ला

वेंगुर्ले तालुक्यात बैल झुंजी सारखे प्रकार आपल्या गावामध्ये घडत असल्यास त्याची कल्पना पोलिसांना तात्काळ पोलिस पाटील यांनी द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी आजच्या बैठकीत केले. चार दिवसांपूर्वी बैल झुंजीमध्ये मालवण येथे बाबु नावाच्या बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र लोकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याच पहायला मिळाल.

बैलांच्या झुंजीना सरकारकडून मान्यता नसूनही गाव पातळीवर काही भागात अजुनही बैलांच्या झुंजी होत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घघटना होतात. यालाच आळा घालण्यासाठी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री तानाजी मोरे यांनी वेंगुर्ला हद्दीतील गावातील पोलीस पाटीलांची बैठक घेतली. बैठकीमध्ये पोलीस पाटीलांना काही सूचना देण्यात आल्या तसेच असे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पोलीस पाटील श्री मधुसूदन मेस्त्री ( आरवली ), सौ निकिता पोखरे ( आजगाव ) ,सौ ऋतिका नाईक, ( पाल ) सौ अश्विनी खवणेकर , ( मोचेमाड ) श्री जनार्दन पेडणेकर ( दाभोली ) श्री निलेश पोळजी ( आसोली ) ,श्री बाबू गावडे ( अणसुर ), श्री विजय नार्वेकर ( उभादांडा ) ,श्री धोंडू खानोलकर ( खानोली ) आदी पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा