You are currently viewing शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

महाविद्यालयातील अनु. जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गासाठी सन 2020-21 व सन 2021-22 करिता महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण करण्यासाठी शासनाने दि. 30 एप्रिल 2022 अखेर मुदतवाढ दिली आहे.

                जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी जे विद्यार्थी स्कॉलरशिप योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती यजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जांचे नुतनीकरण त्वरीत करावे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास त्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील. तसेच महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्यांनी तात्काळ कार्यवाही करावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, दीपक घाटे यांनी केले आहे.

                याबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक, 02362-228882 येथे संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा