You are currently viewing हडपीड येथे श्री स्वामी समर्थ मठात प्रकट दिन उत्सव व मठाचा तिसरा वर्धापन दिन दिमाखात साजरा..

हडपीड येथे श्री स्वामी समर्थ मठात प्रकट दिन उत्सव व मठाचा तिसरा वर्धापन दिन दिमाखात साजरा..

देवगड :

 

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमूळे सर्वच मंदिरातील उत्सवावर शासनाने बंदी घातली होती. मंदिरातील सर्व उत्सव हे शासनाच्या नियम पाळून साजरे केले जात होते मात्र साध्या पद्धतीने हे उत्सव साजरे होत होते. दोन वर्षानंतर कोरोनाची लाट ओसरली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मंदिर मंदिरातील वार्षिक उत्सव मोठया लगबगीने गजबजू लागले.हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठात देखील मोठ्या दिमाखात प्रकट दिन उत्सव व श्री स्वामी समर्थ हडपीड मठाचा तिसरा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला. मठाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन हिंदू वर्षाच्या स्वागताची भव्य शोभायात्रा शिरगाव श्री पावणाईदेवी मंदिर ते शिरगाव बाजारपेठ पर्यत काढण्यात आली होती.या शोभा यात्रेत मोठ्या उत्साहाने शिरगाव मधील स्वामी भक्तांनी आपला सहभाग दाखवला होता.

रविवारी सकाळी स्वामींची विधिवत पूजा होमहवन श्री व सौ जाधव उभयतां कडून करण्यात आले तसेच हवनकुडाचे उदघाटन ,स्वामींची पाद्यपूजा व दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच श्री व सौ शामकांत जोशी दांपत्याना यावर्षी सत्यनारायणाची महापूजेला बसण्याचा मान मठाच्या वतीने देण्यात आला.त्यानंतर मठाभोवती पालखी प्रद्रक्षिणा सोहळा झाला स्वतः शिवसेना नेते संदेश पारकर यांनी देखील पालखी खांद्यावर घेतली होती. स्वामींना नैवेद्द दाखविलेनंतर स्वामीची महाआरती झाली. त्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले.यावर्षी थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची संधी मठाच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली होती.त्यामुळे स्वामी भक्त मोठ्या श्रध्देने स्वामींच्या चरणावर लिन होताना दिसत होते.यात विशेष म्हणजे मठात करण्यात आलेली फुलांची आरास व फळांची सजावट खूप लक्षवेधी होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा