You are currently viewing कोमसाप मालवणतर्फे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्यस्तरीय चैत्रपालवी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन.

कोमसाप मालवणतर्फे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्यस्तरीय चैत्रपालवी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन.

मालवण

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद मालवण यांच्यावतीने राज्यस्तरीय “चैत्र पालवी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे” आयोजन शुक्रवार दिनांक १५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.काव्यलेखनाचा विषय- “निसर्ग कविता” आहे. स्पर्धेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.

१) सदर स्पर्धा राज्यस्तरीय व खुल्या गटासाठी असून सर्व कवी सहभागी होवू शकतात.

२) स्पर्धेसाठी लिहिलेली कविता १६-२० ओळींपेक्षा जास्त नसावी.

३) कविता ही आशयसंपन्न आणि व्याकरण दृष्ट्या परिपूर्ण असावी.

४) परिक्षकांनी दिलेला निकाल अंतिम राहील. त्यात कोणताच फेरबदल होणार नाही.

५) दिलेल्या विषयावर अभिजात व्याकरणाचे मान्यताप्राप्त असलेला कवितेचा कुठलाही प्रकार चालेल.

६) स्पर्धकाने आपल्या स्वरचित कवितेच्या वाचनाचा व्हिडिओ बनवून १० एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत श्री. गुरुनाथ ताम्हणकर (9420738375) या नंबरवर पाठवावा. सोबत आपला एक फोटो, पत्ता व लिखित कविताही पाठवावी.

७) कविता वाचनाचे व्हिडिओ कोमसाप मालवणच्या You Tube Chanel वर शुक्रवार दिनांक १५ एप्रिलला (कवीवर्य सुरेश भट यांच्या जन्मदिनी) प्रसारित करण्यात येतील.

८) या व्हिडिओंना मिळालेले लाईक्स व परीक्षकांचे गुणदान यावरुन निकाल.

शुक्रवार दिनांक २२ एप्रिल (जागतिक वसुंधरा दिन)रोजी जाहिर करण्यात येईल. लाईक्स साठी 10 गुण व परीक्षकांचे 90 गुण असतील.

९) प्रथम तीन स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव केला जाईल. सहभागी सर्व स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.प्रथम क्रमांक ३००० रु. व प्रमाणपत्र.द्वितीय क्रमांक २००० रु. व प्रमाणपत्र.तृतीय क्रमांक १००० रु. व प्रमाणपत्र.

अधिक माहितीसाठी संपर्क श्री. गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर, (स्पर्धा संयोजक तथा उपाध्यक्ष कोमसाप मालवण.) – 9420738375 यांचेशी करावा व जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे अशी विनंती कोकण मराठी साहित्य परिषद मालवण अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =