You are currently viewing खरा धर्म मानव धर्म

खरा धर्म मानव धर्म

धर्म या संकल्पनेत पाप – पुण्याचे स्थान काय ?

क्रमशः…

या संदर्भात जीवन विद्येचा खालील सिद्धांत चिंतनीय आहे – *”अक्कलशून्य माणसे इतरांची निंदा-नालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात कारण निंदा-नालस्ती करणे ही एकच गोष्ट अशी आहे की, तिला अक्कल लागत नाही.”* थोडक्यात, निंदा-नालस्ती करण्याची सवय सोडून माणसाने शुभ बोलण्याची सवय प्रयत्नपूर्वक अट्टाहासाने स्वतःच स्वतःला जोडवून घेतली पाहिजे. हे साधण्यासाठी माणसाने इतरांचे गुण पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणूनच जीवनविद्या सांगते-

*”दुसऱ्यांचे दोष पाहायला अक्कल लागत नाही पण इतरांचे गुण पाहायला मात्र शहाणपण लागते.”*

थोडक्यात, जगाला जिंकण्याचे प्रचंड सामर्थ्य शुभ बोलण्यात आहे, या सत्याची जाणीव मानव जातीला होणे अत्यंत आवश्यक आहे.

आता शुभ करणे म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. या संदर्भात जीवनविद्येचा खालील सिद्धांत लक्षणीय आहे-

*”इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे तर दुसऱ्यांच्या दुखात आपले दुःख दडलेले आहे याची स्पष्ट जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती घडणार नाही.”* ( क्रमशः…)

 

*–सद्गुरु श्री वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा