You are currently viewing सुख – दुःख..

सुख – दुःख..

सामान्यपणे ज्यांना आपण सज्जन माणसे म्हणतो अशा सज्जन माणसांच्या वाट्याला दुःखी जीवन येते याचे कारण काय?

 

जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे तो हा की,हे सर्व विश्व निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालत असून हे निसर्ग नियम लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण असते. खड्ड्यात पाय पडला तर तो मोडणार किंवा गंभीर दुखापत होणार, मग तो पाय सज्जन माणसाचा असो किंवा दुर्जन माणसाचा असो.अशा परिस्थितीत सावध चित्त राहून खड्डा ओलांडून जाणे किंवा त्याला वळसा घालून जाणे हे महत्त्वाचे असते.त्याचप्रमाणे सज्जन माणसांच्या बाबतीत प्रकार घडत असतो. *अपवाद वगळता बहुतेक सज्जन माणसे निराशाजनक व हानिकारक असे अशुभ चिंतन सदैव करीत असतात.जसे विचार त्याप्रमाणे जीवनाला आकार प्राप्त होतो.(As you think, so you become) या निसर्ग नियमाप्रमाणे निराशाजनक व हानिकारक चिंतन करणाऱ्या सज्जन लोकांच्या वाट्याला त्याच प्रकारची दु:खद परिस्थिती प्राप्त होते.*

या संदर्भात अमेरिकन तत्त्वज्ञ डॉक्टर मर्फी यांचे खालील उद्गार उल्लेखनीय आहेत.

*Any thought or action which is not harmonious whether through ignorance or design, results in discord and limitation of all kinds.God has nothing to do with unhappy or chaotic conditions in the world.All these conditions are brought about by man’s negative and destructive thinking.It is therefore silly to blame God for your troubles and sufferings.*

🎯 *तात्पर्य,’जशी मनःस्थिती तशी परिस्थिती’ हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे,म्हणून परिस्थिती पालटण्यासाठी प्रयत्नपूर्वक मन:स्थितीत पालट घडवून आणणे आवश्यक असते.*

आता या संदर्भात दुर्जन माणसे कसा विचार करतात किंवा चिंतन करतात असा प्रश्न निर्माण होईल.याचे उत्तर असे की,सामान्यपणे ही दुर्जन माणसे विचार करण्याच्या किंवा चिंतन करण्याच्या भानगडीत सहसा पडत नाहीत,तर ते त्यांना जे पाहिजे ते करून मोकळे होतात व त्याचे बरे वाईट परिणाम भोगतात.

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 9 =