You are currently viewing गुढी उभारा गुढी

गुढी उभारा गुढी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार श्री अरविंद जी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

आज जाहली वेळ पुन्हा घालण्या साद एवढी
गड्यांनो गुढी उभारा गुढी

अंतर आपण किती कापले
किती मळविल्या वाटा
पराक्रमांनी थोपविल्या ही
किति शत्रूंच्या लाटा
अंतरातली आग विझविण्या परि घेई आतां उडी
गड्यांनो गुढि उभारा गुढी ।।
संस्कारांचे ओझे वाटे
तरी तोच वारसा जाण
म ऊ मेणाहुन आम्ही तरिही
वज्रासही भेदू कठिण
जन्म सिद्ध हक्कास जागली पिढी मागुनी पिढी
गड्यांनो गुढि उभारा गुढी ।।

महाभारत ही इथेच घडले
अजून त्याच्या खुणा
आदर्शांचा आदर्श म्हणुनी
आम्हि पुजतो रामायणा
कंस नि रावण इथे न टिकती ही या भुमिची रूढी
गड्यांनो गुढी उभारा गुढी ।।

मॆत्रि साठि हात पुढे अन्
प्रेमाचे ही गुणगान
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
हेच आम्हा वरदान
आ सेतु हिमाचल सीमा आपुली रक्षणास तेवढी
गड्यांनो गुढी उभारा गुढी

चॆत्र शुद्ध प्रतिपदा हीच
भाग्याची मुहूर्तमेढ
विसरू आपण सारी सारी
मना‌ मनातिल तेढ
देवही धर्मही देश आमुचा करु प्राणांची कुरवंडी
गड्यांनो गुढी उभारा गुढी
उत्सव माना वा माना सण
वंद्य असे आम्हाला
अन्य प्रथांना इथे न थारा
त्यांची ओढ कशाला?
जय हिंद गर्जुनी मंत्र अंगणी ओवाळू आवडी
गड्यांनो गुढी उभारा गुढी ।।

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा