You are currently viewing काव्यपुष्प-७२ वे

काव्यपुष्प-७२ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-७२ वे*

—————————————–

आबासाहेब कुबेर शिष्य मागे लागले । मला नियम सांगा,

म्हणू लागले । नाम भगवंताचे घेणे”नियम हाच, महाराज त्यास म्हणाले । निराळा नियम नकोच रे ।। १ ।।

 

समजावती महाराज या शिष्याला । प्रपंचातल्या जगण्याला।

यातल्या दिनक्रम आचरणाला । जोड निश्चयाची योग्य ती ।।२।।

 

पण, भगवंताचा नियम पाळणे । नाही सोपे त्यासी स्मरणे।

कृपा भगवंताची असणे । तरच घडते रे हे ।। ३ ।।

 

चरणी करावी प्रार्थना । मनापासुनी याचना । विसरुनी सारा

“मी पणा” । तरच मिळते कृपा फळ रे ।। ४ ।।

 

अहंकाराचे वाईट वारे । स्पर्श त्याचा मना नको रे ।

मनात असावे प्रेम खरे । तरच होईल परमार्थ सार्थ ।।५।।

*****

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

—————————————-

श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-७२ वे

अरुण वि.देशपांडे-पुणे

—————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − one =