चेअरमन ,आमदार प्रकाश आवाडे यांची माहिती
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहकांचे बहुमुल्य सहकार्य व विश्वासामुळे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेला ४० कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती बॅंकेचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनी आज शुक्रवारी पञकार बैठकीत बोलताना दिली.तसेच
आजच्या आर्थिक टंचाईच्या काळातही बँकेचा मार्च २०२२ अखेर एकूण व्यवसाय ३८०० कोटी रुपयांचा झाला असल्याचे सांगितले.
यंञमाग उद्योग व त्याच्याशी निगडित उद्योगांमुळे इचलकरंजी शहर हे जगातील एकमेव हायटेक विव्हिंग सेंटर म्हणून ओळखले जाते.अशा शहरातील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेने पारदर्शी कारभार करत उद्योग व्यवसायांना कर्ज पुरवठा करुन देशाच्या विकासात योगदान देण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.या
बँकेचे ६३ कोटी रुपये इतके भागभांडवल झाले असून, आर्थिक तरतूदीपूर्वीचा नफा हा ४० कोटी रुपये इतका झाला आहे.यामध्ये २३०० कोटी रुपयांच्या ठेवी
व १५०० कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश असल्याचे बँकेचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनी आज शुक्रवारी पञकार बैठकीत बोलताना सांगितले.तसेच
माजी खासदार व बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी वेळोवेळी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळेच बँक आज चौफेर प्रगती करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मागील आर्थिक वर्षामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे तसेच कोरोनाच्या काळात संपूर्ण नवीन उद्योग व्यवसायाची निर्मिती अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. अशा या कठीण परिस्थितीतही बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीची घोडदौड कायम ठेवली असून एनपीएमध्ये गत वर्षीच्या तुलनेत काहीही वाढ न होता ढोबळ एनपीए साधारण ९ टक्क्यांपेक्षा कमी राखण्यात यश प्राप्त केले आहे. याचे सर्व श्रेय बँकेचे सुज्ञ सभासद आणि कर्जदारांना जाते. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार कोरोना काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यवसाय उद्योजकांना त्यांची कर्ज खाती रिस्ट्रक्चर करण्याचा लाभ बँकेने दिला आहे. गत वर्षीच्या बिकट आर्थिक स्थितीमध्येही कर्जदार सभासदांनी थकीत कर्जाची रक्कम मोठया प्रमाणात वसुलीसाठी सहकार्य केल्यामुळे बँकेचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत. ४ कोटी रुपयाने वाढून ४० कोटी रुपये इतका झाला असल्याचे सांगितले.
यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, संचालक स्वप्निल आवाडे, अशोक सौंदत्तीकर, राजेश पाटील, श्रीचंद टेहलानी, बंडोपंत लाड, महेश सातपुते, शैलेश गोरे, अविनाश कांबळे सुभाष जाधव, सीए मनोहर जोशी, सीए संजयकुमार अनिगोळ, सौ. प्रेमलता पाटील, सौ. सुजाता जाधव, सौ. आक्काताई आएंगे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत, जनरल मॅनेजर संजय सातपुते , संजय शिरगावे, बँकेचे इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.