जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना
तुझ्या “ओके” रिप्लायमुळे
काळजाचे वाढतात ठोके
चॅटिंगची पंक्चर गाडी तुझी
नको बोलूस तू ” ओके ओके “..
तुझा मेंदू वाटतोय मला
कांदे बटाटेने भरलेले खोके
गदागदा हलवून फोड त्याला
नको बोलूस तू ” ओके ओके “..
एकदम बोअर चॅटिंग तुझी
फोडून एटीट्युडचे फटाके
काळी पडलीस तू फटाक्यांनी
नको बोलूस तू ” ओके ओके “..
✒️©️ सचिन मस्कर , नवी मुंबई