You are currently viewing कसई – दोडामार्ग येथे 2 ठिकाणी कंटेन्मेंट झोन….

कसई – दोडामार्ग येथे 2 ठिकाणी कंटेन्मेंट झोन….

सिंधुदुर्गनगरी :

दोडामार्ग तालुक्यातील कसई  – दोडामार्ग येथे दोन ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. सदर कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत. सुरुचीवाडी येथील शिक्षक कॉलनी येथे दिनांक 7 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत, सिद्धीविनायक कॉलनी येथे दिनांक 6 ऑक्टोबर पर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत सर्व अस्थपना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच नागरिकांच्या येण्या-जाण्यास व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. सदर आदेश अत्यावश्यक सेवा जसे सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इ. वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या वाहनांना लागू असणार नाहीत. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 व 58, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 71,139 आणि भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा