सावंतवाडी
सावंतवाडीतील मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटल कलेक्शन उपक्रम राबविला. २१ मार्च ते २८ मार्च ‘या कालावधीत या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटल्स कलेक्शन हा उपक्रम पूर्ण केला. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील तसेच शेजारी-पाजारी आणि परिसरातील टाकाऊ प्लास्टिक बॉटल्स गोळा करून त्या प्रशालेत आणून जमा केल्या. त्याचा गुरुवारी ३१ मार्च रोजी हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला.
सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीम. नाडकर्णी यांच्याकडे विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सच्या तब्बल ७० ते ८० बॅग्स सुपूर्द केल्या. यावेळी श्रीम. नाडकर्णी यांनी या अभिनव उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाबासकी दिली. ही अभिनव संकल्पना प्रशालेचे मुख्याध्यापक रेव्ह.फादर रिचर्ड सालदान्हा यांची होती. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमासाठी लाभला. या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.