राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री शरद पवार साहेबांवर प्रशोभक विधाने करून जनतेमध्ये बदनामी करण्याचा सतत चाललेल्या प्रयत्नांचा बिमोड करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात्मक पवित्रा घेऊन सदाभाऊ खोत यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त करताना गली गली में शोर है सदाभाऊ चोर है. निमका पत्ता कडवा है सदाभाऊ भडवा है, देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले की मा,पवार साहेब हे देशाचे नेते असून देशासाठी व महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान दिले आहे,हे देशासह महाराष्ट्रातील जनतेला सर्वश्रृत असताना आणि विरोधक (भाजप) हेही खाजगीत मान्य करत असूनही विरोधक आपण सतत प्रकाश झोतात राहण्यासाठी आणि राज्यातील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महत्वाची भूमिका पवार साहेबांनी घेतली याचे शल्य भाजप नेत्यांच्या मनातून अद्याप जात नाही,हेच शल्य मनात घर करून सदाभाऊ खोताच्या आहे,सदाभाऊ खोत यांना जनतेने नाकारलेले आहे, आणि भविष्यात आमदारकी मिळेल या आशेवर नजर ठेवून पवार साहेबांवर खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा व भाजप नेत्यांची मर्जी संपादन करण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी हा चालविलेला बालीश प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कधीही खपवून घेणार नाही, यापुढे विरोधकांनी आमच्या नेत्यांवर टिका करणे थांबवावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस यापेक्षाही विरोधकांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेऊन जशास तसे उत्तर देईल,असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.
यावेळी काका कुडाळकर, बाळ कनयाळकर, प्रफुल्ल सुद्रीक यांनी सदाभाऊ खोताच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडताना यापुढे विरोधकांनी आमच्या नेत्यांवर नाहक टिका करताना चुकीचे काही होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक,जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, शिवाजी घोगळे, पुंडलिक दळवी, नझीर शेख,आत्माराम ओटवणेकर, प्रतिक सावंत, राजेश पाताडे, राजेंद्र पावसकर, इफ्तिकार राजगुरू, अनंत पिळणकर. देवेंद्र पिळणकर, रुजाय फर्नांडिस, निलेश गोवेकर, दत्तात्रय धुरी, सुर्यकांत नाईक, सत्यवान साटेलकर यांचे सह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,