You are currently viewing डॉ.सुधीर तारे यांची नोबेल पुरस्कार नॉमिनेशन कमिटीवर नॉमीनेटर म्हणून नियुक्ति

डॉ.सुधीर तारे यांची नोबेल पुरस्कार नॉमिनेशन कमिटीवर नॉमीनेटर म्हणून नियुक्ति

 

नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘सर अफ्ल्रेड नोबेल’ यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी 1901 पासून पुरस्कार दिला जातो. सर आल्फ्रेड नोबेल या स्वीडिश शास्त्रज्ञाने डायनामाइट या स्फोटकाचा शोध 1867 मध्ये लावला. अशा प्रकारचे बरेच शोध त्यांनी लावले. यामधून मिळालेल्या पैशाचा हिस्सा त्यांनी एका ट्रस्टच्या नावे ठेवला व त्याच्या व्याजातून प्रतिवर्षी
साहित्य, शांतता, पदार्थ विज्ञान, रसायानशास्त्र, भौतिकशास्त्र या क्षेत्रांत महत्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देण्यात यावेत, असे सुचवले.
भारताच्या डॉ सुधीर तारे यांची नोबेल पुरस्कार नॉमिनेशन कमिटी वर नॉमिनेटर या पदावर
झाली आहे. नोबेल पुरस्कारसाठी नामांकन करणाऱ्या समितिचे सदस्य या पदावर झालेली नियुक्ती म्हणजे अतिशय दुर्लभ सन्मान आहे अशी प्रतिक्रिया डॉ.निलांबरी गानू यांनी दिली आहे.
डॉ. सुधीर तारे यांच्या स्नेही प्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ. निलांबरी गानू राजगुरुनगर, पुणे यांनी याबाबतची माहिती दिली संवाद मिडीयाला आहे. डॉ.तारे यांना मिळालेल्या सन्मानामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 14 =