You are currently viewing जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूलचे यश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूलचे यश

सावंतवाडी

मळगाव येथील कै. उदय खानोलकर वाचन मंदिर तर्फे आयोजित व डॉक्टर अरविंद खानोलकर पुरस्कृत स्व . डॉ . सौ. मालती दत्तात्रय खानोलकर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कुल सावंतवाडीने स्पृहणीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेच्या लहान गटात अस्मी प्रवीण मांजरेकर हिने तृतीय तर मोठ्या गटात मनस्वी प्रवीण मांजरेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेत जिल्हाभरातील 35 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण भरत गावडे, चंद्रकांत सावंत, सौ. गावडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − twelve =