नवी दिल्ली:
केंद्रातील एका उच्चस्तरीय प्रशासकीय फेरबदलात मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रालये आणि मुख्य सरकारी संस्थांमधील सहसचिव स्तरावर आणि त्या समकक्ष स्तरावर १६ वरिष्ठ अधिका-यांची नेमणूक मंजूर केली आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने संयुक्त सचिव, सहसचिव समतुल्य स्तरावर अधिका-यांच्या पुढील नेमणुका मंजूर केल्या आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती, कर्मचारी मंत्रालयाने एका अधिसूचनेत दिली.
सन १९९० तुकडीच्या हिमाचल प्रदेश केडरच्या आयपीएस अधिकारी श्याम भगत नेगी यांची कोळसा मंत्रालयाचे सहसचिव म्हणून तर १९९२ बॅचचे आयआरएस अधिकारी अमिताभ कुमार यांना वाणिज्य विभागात सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले असून या “पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या मुदतीसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत, जे आधी असेल” तोपर्यंत ही नियुक्ती वैध आहे. असे अधिसूचनेत म्हटले आहे.
सन २००२ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी एम. आंगमुथु यांना वाणिज्य मंत्रालयांतर्गत कृषी व प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे (एपीईडीए) अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. तसेच दुसरे आयएएस अधिकारी आशीष चटर्जी यांची राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयात नवीन वरिष्ठ संचालक कर्मचारी, एसडीएस (सिव्हिल) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयएफएसचे वरिष्ठ अधिकारी अनुराग बाजपेयी संरक्षण उत्पादन विभागाचे नवीन सहसचिव असतील तर आयएएस अधिकारी संजय लोहिया खाण मंत्रालयात नवीन जेएस असतील आणि आयआरपीएस अधिकारी सुखेंदू ज्योती सिन्हा हे नीति आयुषात सल्लागार असतील. सर्व नियुक्त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असेल.
तसेच अधिसूचनेनुसार रेखा यादव सहसचिव म्हणून पंचायती राज विभागात काम करणार आहेत, तर आशिष शर्मा आणि राहुल सिंग हे संयुक्तपणे कार्मिक व प्रशिक्षण विभागात संयुक्त सचिव म्हणून काम पाहतील. या दोन्ही अधिका-यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
या अधिसूचनेत महमूद अहमद यांची रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संयुक्त सचिव म्हणून पाच वर्षांच्या मुदतीच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली.
तर केशांग यांगझोम शेर्पा यांना शालेय शिक्षण व साक्षरता विभागांतर्गत येणा-या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे सदस्य सचिव म्हणून घोषित केले आहे. चेतन प्रकाश जैन हे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत (सीएसआयआर) नवीन सहसचिव आणि आर्थिक सल्लागार असतील.
१९९५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी एम. महेश्वर राव यांना जी. जयंती यांच्यासह बेंगळुरूच्या अवकाश विभागातील सहसचिव आणि आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने महिला व बालविकास मंत्रालयात सहसचिव म्हणून अदिती दास राऊत यांचे नाव देखील मंजूर केले आहे.