जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारीत ज्येष्ठ लेखक कवी प्रा.डॉ. जी. आर. उर्फ प्रवीण जोशी यांची अप्रतिम काव्यरचना
असेन मी नसेन मी
सुगंध जतन करेन मी
कोण मी कोण तु
कोण फुल पान तु
बहरू सदैव चराचरी
सृजन गीत गात तु
निर्माल्य मी निर्माल्य तु
येता ग्रीष्म हा ऋतू
मिसळुन चैतन्य नवे
होऊन माती श्रांत तु
थेंब थेंब बरसता
संजीवनी वर्षा ऋतू
फुटून येऊ पानोपानी
फुल मी पान तु
सृजनशील गीत गात
नवजन्माने मग परतु
असेन मी असशील तु
सुगंध कुपी देशील तु
प्रो डॉ प्रवीण ( जी आर )
जोशी
अंकली बेळगांव
कॉपी राईट