You are currently viewing आपली मराठी

आपली मराठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी नयन धारणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आपली मराठी*

प्रश्न भाषेचा निर्माण होतो तेव्हा तेव्हा
केवळ नावालाच वापरली जाते मराठी

इंग्रजी आणि हिंदी म्हणजे पुढारलेले
तर आपली हीनदर्जेची वाटते मराठी..

मग…
खरंच रक्तारक्तात भिणते का मराठी ?
तुम्हीच सांगा….

दोन मराठी माणसे एकत्र येऊन सुद्धा
संवादात अज्ञातस्थळी हरवते मराठी..

आपल्याच लोकांमध्ये बोलता बोलता
कुठेतरी मध्येच अचानक संपते मराठी

तेव्हा….
खरंच श्वासाश्वासात गर्जते का मराठी ?
तुम्हीच सांगा…

शाळेत देखील इंग्रजीचे प्रस्थ वाढत असून
नुसती विषयापुरती मर्यादित असते मराठी

दऱ्याखोऱ्यात नद्यांमध्ये गावाच्या वेशीवर
तटस्थ राहूनी वाट आपली पाहते मराठी

तेव्हा….
खरंच गावागावात वाढते का मराठी ?
तुम्हीच सांगा….

~ नयन धारणकर,नाशिक
8275838003

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =