कणकवली :
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सिक्युरिटी मधील गाड्याना अपघात झालाय. खारेपाटण चेक पोस्ट नजीक हा अपघात झाला आहे. मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी सकाळी ११:३० च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या मागो माग या गाड्या होत्या मात्र एका गाडीने ब्रेक मारला असता. ताफ्यातील या गाड्या एकमेकांवर आपटून हा अपघात झाला. हा अपघात हॉटेल मधुबन नजीक झाला, मात्र यात कोणी जखमी झाले नसले तरी गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.