फोंडाघट :
बालपणीच्या अनेक आठवणी असतात. मात्र जस -जस वय वाढत जात शिक्षणाच्या पायऱ्या चढल्या जातात अशी प्रत्येकाचे मार्गक्रमण देखील वेगवेगळ्या दिशेला होत जात.असाच एक अनोखा अनुभव आला. फोंडाघाट हायस्कूल ची ही १९८८सालची बॅच. अनेक प्रकारे सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात होती, मात्र प्रत्यक्ष संपर्क हा एक वेगळाच आनंद देऊन जाणारा असतो. त्यात काही अनुभवही घेता येतात तर अनुभव इतरांना देता येतात.
आपल्या आयुष्यात मित्र का महत्वाचे आहेत? हे मात्र या एकत्र येण्याने दिसून आलं. बालपणीच्या आठवणीवर या फोंडाघाट हायस्कूलच्या १९८८ सालच्या बॅचचा हा एकत्रित संवाद घडून आला. हा स्नेह मेळावा डामरे येथील आबा मोर्ये यांचे फार्म हाऊस येथे संपन्न झाला.
यावेळी या मेळाव्यास श्रीकृष्ण नाणचे, अवि चाचुर्डे, अशोक पिळणकर, विठोबा म्हसकर, भारती पवार , पुष्पा तिरोडकर , पपा राणे , सुशील गोसावी, अनंत सावंत, कृष्णा एकावडे , मिलिंद जाधव , मुकुंद चव्हाण , अनिल फोंडेकर , बाळा धोपटे , आनंद पावसकर , रमेश तेली , यांच्यात बालपणीच्या आठवणीतून हा स्नेह मेळावा रंगला होता.
आजच्या काळात असे स्नेहा मेळावे होणे गरजेचे असल्याचे श्रीकृष्ण नाणचे सर यांनी संवादावेळी सांगितले. यावेळी या ग्रुपच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक देखील श्री.नाणचे सरांनी केले व सर्वांचे आभार मानले.