You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात काँग्रेसचा जोरदार धमाका…

दोडामार्ग तालुक्यात काँग्रेसचा जोरदार धमाका…

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व प्रवक्ते तसेच दोडामार्ग तालुका निरिक्षक  इर्शाद शेख व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व दोडामार्ग निरिक्षक आनंद परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दोडामार्ग तालुक्यातील भाजप व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सर्वश्री संदेश बलसिंग बोर्डेकर माजी शिवसेना शहर अध्यक्ष, भाजपचा माजी नगरसेविका सौ. वैष्णवी विष्णू रेडकर, विष्णू प्रकाश रेडकर प्रमुख भाजप कार्यकर्ते तसेच मनोज विठ्ठल खांबल,सचिन सुरेश उगाडेकर, सुदेश सोनू उगाडेकर, सौ.प्रेरणा प्रताप नाईक,सुंदर रामा गावकर इत्यादी भाजप,सेनेचा कार्यकत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

सदर प्रसंगी दोडामार्ग तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री.वासुदेव नाईक, जिल्हा चिटणीस श्री.सुभाष दळवी, दोडामार्ग तालुका काँग्रेस उपाध्यक्ष शिवदास मणेरीकर,दोडामार्ग तालुका सरचिटणीस श्री.सुधीर चांदेलकर,दोडामार्ग शहर काँग्रेस अध्यक्ष श्री.सुधीर गवस, दोडामार्ग तालुका सेवादल अध्यक्ष श्री.शाम सावंत, तालुका कार्यकारिणी सदस्य सुमंत मणेरीकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे, सत्यवान गवस आदी उपस्थित होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा