You are currently viewing पावशी येथील राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत राजाराम आत्माराम चव्हाण (संगमेश्वर) यांची बैलगाडी प्रथम

पावशी येथील राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत राजाराम आत्माराम चव्हाण (संगमेश्वर) यांची बैलगाडी प्रथम

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर,आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेना सरपंच, उपसरपंच संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत स्पर्धेचे आयोजन पावशी ढवणवाडी येथे रविवारी करण्यात आले होते.हजारो रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत बैलगाडी स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली.राज्यभरातून सुमारे ३० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक राजाराम आत्माराम चव्हाण (संगमेश्वर) यांच्या बैलगाडीने पटकावला.

मिलिंद केळकर यांच्या बैलगाडीला मानाचे स्थान मिळाले. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी या मानाच्या बैलगाडीत स्वार होत, बैलगाडी सफरीचा आनंद लुटला. शासनाने घातलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरीसह राज्यभरातील सुमारे 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक राजाराम आत्माराम चव्हाण (संगमेश्वर), द्वितीय क्रमांक धनश्री विजय शेलार (सांगवे रत्नागिरी), तृतीय क्रमांक समीर चंद्रशेखर बने (संगमेश्वर), उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक अवधूत सुभाष राणे (कणकवली) व उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक आजीम अब्दुल मुजावर (कुडाळ) यांच्या बैलगाडीने मिळविला. या सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रोख पारितोषिक व आकर्षक चषक वितरीत करून गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी संघाना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

बैलगाडी शर्यत स्पर्धेस परवानगी मिळाल्यानंतर सिंधुदुर्गात कुडाळ मध्ये प्रथमच राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धक व प्रेक्षकांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते,शिवसेना नेते संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना विस्तारक रुची राऊत, तालुकाप्रमुख राजन नाईक, जि.प.गटनेते नागेंद्र परब, सरपंच संघटना अध्यक्ष सचिन कदम, पावशी सरपंच बाळा कोरगांवकर, नेरूर सरपंच शेखर गावडे, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, हळदीचे नेरूर सरपंच सागर म्हाडगुत, तालुका संघटक बबन बोभाटे, जयभारत पालव, नगरसेवक उदय मांजरेकर, सचिन काळप, माड्याचीवाडी सरपंच सचिन गावडे, आंब्रड सरपंच विठ्ठल तेली, हुमरस सरपंच अनुप नाईक, हुममळा (वालावल) सरपंच सौ.अर्चना बंगे, हुमरमळा (अणाव) सरपंच सौ.जान्हवी पालव आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना सरपंच-उपसरपंच संघटना पदाधिकारी आणि बैलगाडी शर्यत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धे दरम्यान चेंदवण येथील ढोलपथकाने लक्षवेधी ढोलवादन सादर केले. उपस्थित मान्यवरांचे जंगी स्वागत सरपंच उपसरपंच संघटनेचे सचिन कदम, बाळा कोरगांवकर व अन्य सहकारी सरपंच व उपसरपंच यांनी केले. स्थानिक ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी होण्यास सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा