You are currently viewing गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या..!

गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या..!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जावा अशी संयुक्तरीत्या मागणी

 

सिंधुदुर्ग :

 

विधानसभेत पणन मंत्री अब्दुल सत्तार याच्या अध्यक्षतेखाली कोकणातील आमदारांची विशेष बैठक झाली.या बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गोवा राज्यात ज्या पद्धतीने काजु बीला अनुदान दिले जाते, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या.त्यासाठी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील निर्णय घेतला जावा अशी मागणी आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह उपस्थितांनी काजू बिला अनुदान देणेबाबतच्या बैठकीत मंत्र्यांकडे संयुक्तरीत्या केली.

मंत्री महोदयांनी काजू प्रक्रिया उद्योग व भावांतर योजनेंतर्गत काजू बियांना अनुदान देणेबाबत चर्चा करताना गोव्यात ज्यावेळी १३० रुपये दर असेल तर वरचे वीस रुपये अनुदान दिले जाते. त्या धर्तीवर शेतकऱ्यांना बाजारपेठेत मिळत असणाऱ्या दराच्या वरील रकमेचे अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत ही मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्या समोर ठेवून ती अधिवेशनात घेण्याविषयी सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा