आखिल भारतीय साहित्य परीषद कल्याण तर्फे जेष्ठ कवियत्री शांताबाई शेळके जन्मशताब्दी निमित्त आयोजित ‘ शांताबाईंच्या
कविता व गाणी ‘ हा कार्यक्रम कल्याण बालक मंदिर सभागृहात २६ मार्चला पार पडला.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रविण देशमुख गझलकार, मराठी हिंदी कवियत्री सुरेखा मालवणकर ,पत्रकार माधव डोळे ,संस्थेचे महामंत्री संजय द्विवेदी उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरवात जय शारदे वागीश्वरी ह्या शांताबाईंच्या गाण्याने झाली .त्या नंतर विविध कलाकारांनी शांताबाईंच्या कविता व गाणी सादर करुन कार्यक्रम बहारदार केला .कवियत्री निवेदिका स्वाती नातू यांनी सुत्रसंचालन केले .
शेवटच्या सत्रात कवियत्री सुरेखा मालवणकरांनी कार्यक्रमाचा आढावा घेऊन आपले सुंदर मनोगत व्यक्त कले व आगामी कार्यक्रमास शुभेच्छाही दिल्या.