You are currently viewing शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज च्या वतीने शिवसेनेचे आमदार व विजयराव नाईक फार्मसी कॉलेज चे संस्थापक वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान व महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक सतीश विजयराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरात 60 जणांनी सहभाग घेतला. तर आरोग्य तपासणी शिबिराचा 80 जणांनी लाभ घेतला. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयाचे डॉक्‍टर व रक्तपेढीचे कर्मचारी या रक्तदान शिबिराला उपस्थित होते. तर डॉक्टर मानसी वालावलकर यांनी तपासणी केली.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कणकवलीतील डॉ. मिलिंद म्हसकर, विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचे संचालक मंदार सावंत, मेघा बाणे, उपप्राचार्य पूजा पटेल, प्रा. चंद्रशेखर बाबर, प्रा. अमर कुलकर्णी, व विजयराव नाईक कॉलेजचे विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते. महिलांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर बद्दल समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा