You are currently viewing कबनूर उरुसातील पाळण्याचे अवाजवी दर कमी करण्याची मागणी

कबनूर उरुसातील पाळण्याचे अवाजवी दर कमी करण्याची मागणी

इचलकरंजी / प्रतिनिधी

कबनूर उरुसातील पाळणे व मनोरंजनाच्या खेळाच्या साहित्याचे अवाजवी दर कमी करण्यात यावे ,अशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार संरक्षण समितीच्या वतीने प्रांत कार्यालय व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयास देण्यात आले.

इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर गावचा उरुस हा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.पण ,कोरोना महामारी व शासनाच्या निर्बंधांमुळे तो गेली तीन वर्षे भरवण्यात आला नव्हता.माञ ,कोरोनाचे सावट कमी झाल्याने यंदाच्या वर्षी कबनूर उरुस मोठ्या प्रमाणात भरवण्याचा निर्णय ग्रामपंचायत व उरुस कमिटीने घेतला आहे.परंतू , यावर्षी पाळण्याचे दर हे प्रती व्यक्तीसाठी 60 रुपये लावण्यात येणार असल्याची चर्चा गावामध्ये चालू आहे. पण सदरचा तिकीट दर हा अवाजवी पद्धतीचा असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही.कारण , आधीच कोरोना महामारी ,लाॅकडाऊन व वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे.त्यात मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी वापरण्यात येणारे पाळणे व खेळाच्या साहित्याचे तिकीट दर हे अवाजवी लावून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करण्याचा काहींचा प्रयत्न दिसत आहे.याच अनुषंगाने उरुसातील पाळणे व मनोरंजन खेळाच्या साहित्याचे दर कमी करण्यात यावे ,अशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार संरक्षण समितीच्या वतीने प्रांत कार्यालय व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयास देण्यात आले.तसेच याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास कबनूर चौकात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी माहिती अधिकार संरक्षण समितीचे राज्याध्यक्ष सलीम शेख ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा कलावती जनवाडे ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमर जाधव ,पश्चिम महाराष्ट्र संघटक रवी कांबळे, तालुका अध्यक्षा लिलावती खोत, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा विद्या पवार ,राहुल महालिंगपुरे ,दत्ता पाटील ,कुंदन आवळे , फिरोज फकीर , रविंद्र धनगर ,प्रशांत जगताप यांच्यासह कबनूर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.दरम्यान ,या निवेदनाच्या प्रती अप्पर तहसीलदार , शिवाजीनगर पोलिस ठाण्यास देखील सादर करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा