You are currently viewing दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू…

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू…

महामार्गावरील नांदगाव शाळा नंबर १ नजिकची घटना ; दुचाकीस्वार किरकोळ जखमी…

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव केंद्र शाळा नंबर १ नजिकच्या वहाळ दरम्यान काल सायंकाळी ७.३० च्या दरम्यान दुचाकीच्या धडकेत पादचारी सुर्यकांत शांताराम बिडये रा. नांदगाव (बिडयेवाडी) वय ४९ यांचा मृत्यू झाला आहे.

सदर अपघात एवढा गंभीर होता की, सदर पादचाऱ्याला धडकून दुचाकीस्वार बाजूला असलेल्या वहाळात जावून पडला. यामुळे दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. तर पादचारी सुर्यकांत शांताराम बिडये रा. नांदगाव (बिडयेवाडी) यांना गंभीर दुखापत झाल्याने तातडीने कणकवली येथे नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ओरस येथे हलविण्यात आले होते. ओरस येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने नांदगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा