पावशी :
माजी आमदार कै. पुष्पसेन सावंत स्मृति प्रित्यर्थ भव्य दिव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत पावशी येथे होत आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यातून स्पर्धक दाखल होणार आहेत. बैलगाडी शर्यत स्पर्धेस परवानगी मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग येथील पावशीमध्ये हि पहिलीच राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा दिनांक 26 मार्च रोजी दुपारी २ वाजता पावशी, मिठकेचीवाडी येथे होणार आहे.
शासनाने घातलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून ही स्पर्धा पार पडणार आहे. या भव्य बैलगाडी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रु. 11,111 व चषक शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांजकडून तर द्वितीय पारितोषिक रु,7,777 व चषक अमरसेंन सावंत याजकडून कै. भास्कर साळगावकर यांच्या स्मरणार्थ तर तिसरे पारितोषिक रु. 5, 555 कै. अभि भोगटे यांच्या स्मरणार्थ व उत्तेजनार्थ रु. 3, 333 अवधूत स्पोर्ट्स याजकडून तर उत्कृष्ट चालक रु. 501 व उत्कृष्ट जोडी रु. 501 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
बैलगाडी शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री ब्राह्मण देव मित्र मंडळ मिठकेची वाडी आणि अभिषेक चंद्रकांत वाटवे यांच्यावतीने करण्यात आले आहे.