You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच नाशिक ही संस्था शासन दरबारी रजिस्टर

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच नाशिक ही संस्था शासन दरबारी रजिस्टर

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, नाशिक ही देशातीलच नव्हे तर विदेशातील साहित्यिकांची मंदियाळी असलेली संस्था असून नाशिक स्थित उद्योगपती साहित्यिक पांडुरंग कुलकर्णी हे तिची धुरा वाहत आहेत. जनसंपर्क अधिकारी म्हणून विलास कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या कमान सांभाळलेली आहे. गेली काही वर्षे साहित्य सेवा देणारी “सा क व्य” ही संस्था अखेर महाराष्ट्र शासनाच्या दरबारात साहित्य संस्था म्हणून रजिस्टर करण्यात आली असून संस्थेचा डोलारा सांभाळण्यासाठी जम्बो कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. जेणेकरून पुढील काळात देखील सा क व्य कडून भरीव असे कार्य होण्यास मदत होईल आणि संस्थेचे नाव देखील जगाच्या कानाकोपऱ्यात गाजेल.
साकव्यच्या कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष पदाची धुरा खुद्द सा क व्य प्रमुख श्री.पांडुरंग कुलकर्णी नाशिक, हे सांभाळत असून उपाध्यक्ष पदासाठी श्री.चिदानंद फाळके नाशिक यांची निवड करण्यात आली आहे. सचिव म्हणून श्री.चंद्रशेखर शुक्ल,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, खजिनदार
सौ.प्रियांका कुलकर्णी, मुंबई यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य पदांवर श्री.निशिकांत देशपांडे पुणे.
श्री.हरिभाऊ कुलकर्णी नाशिक.
सौ.अलका कुलकर्णी, नाशिक… यांची निवड जाहीर केली आहे.
सदर सा क व्य विकास मंच ही संस्था शासन दरबारी रजिस्टर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे
आपल्या साकव्य प्रशासनाच्या दृष्टीने आणि सर्व सभासद यांच्याशी संपर्क साधून भरीव कार्य करण्यासाठी विभागवार जबाबदारी खालील कार्यकारिणी सदस्य यांनी एकमताने वाटून देण्यात आली आहे.
अध्यक्ष श्री पांडुरंग कुलकर्णी यांच्याकडे भारताच्या बाहेरील सर्व देश. उपाध्यक्ष श्री चिदानंद फाळके यांच्याकडे भारतातील महाराष्ट्र वगळून बाहेरील सर्व राज्ये. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मधील सर्व जिल्हे खालील उर्वरित २ पदाधिकारी आणि ३ कार्यकारिणी सदस्य यांना वाटून देण्यात आले आहेत.
सचिव श्री चंद्रशेखर शुक्ल यांचे कडे अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्हे.
खजिनदार सौ.प्रियांका कुलकर्णी यांचे कडे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे.
कार्यकारिणी सदस्य
श्री निशिकांत देशपांडे यांचे कडे
पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हे.
कार्यकारीणी सदस्य
श्री हरिभाऊ कुलकर्णी यांच्या कडे धुळे, नंदुरबार,जळगाव, बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि नाशिक जिल्हे.
कार्यकारीणी सदस्य
सौ.अलका कुलकर्णी यांचे कडे
औरंगाबाद, जालना, परभणी, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, आणि गडचिरोली जिल्हे.
अशाप्रकारे विविध कार्यकारिणी सदस्यांकडे जिल्हावार जबाबदारी देऊन
“सा क व्य” कडून साहित्य सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. भविष्यात साकव्य कडून भरीव असे कार्य होणे सर्वाना अपेक्षित आहे, आणि साकव्य त्यादृष्टीने नक्कीच प्रयत्नशील राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा