You are currently viewing सावंतवाडीत उद्या धर्मवीर संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार…

सावंतवाडीत उद्या धर्मवीर संभाजी महाराजांना आदरांजली वाहणार…

शिवधर्म प्रतिष्ठानचे आयोजन; खासकीलवाडा येथे उपस्थित राहण्याचे महेश पांचाळ यांचे आवाहन

सावंतवाडी

शिवधर्म प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या माध्यमातून उद्या छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. या निमीत्ताने येथिल खासकीलवाडा येथिल छत्रपती संभाजी चौकात त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. दरम्यान येताना एक दिवा (पणती) आणावी व हा दिवा छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली असून हिंदू धर्म जागृतीसाठी नवी दिशा देणारा असेल.तरी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने ठीक ०७ (सात) वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक सावंतवाडी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा