You are currently viewing माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सहविचार सभेचे आयोजन करावे

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सहविचार सभेचे आयोजन करावे

…..अन्यथा, शिक्षक भारती ३०रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन करणार

तळेरे:- प्रतिनिधी

शिक्षक भारती शासन मान्य संघटनेच्यावतीने तीन वेळा सहविचार सभेच्या आयोजनाबाबत मागणी लेखी मागणी करण्यात आली होती.
शैक्षणिक वर्ष 2021-22 सुरु होऊन संपत आले तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत अद्याप पर्यंत एकाही सहविचार सभेचे आयोजन झालेले नाही त्यामुळे शिक्षक संघटना संभ्रमात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतरांची अनेक कामे प्रलंबित आहेत उदा. मेडिकल बिले, थकीत बिले, फरकाची बिले वरीष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मान्यता प्रस्ताव, न्यायालयीन लढा जिंकलेल्या शिक्षकांचे शालार्थ आयडी, मान्यता, संचमान्यता, अतिरिक्त शिक्षक शिक्षकांचे पुनरप्रत्यवर्तन, मुख्याध्यापक मान्यता, असे कितीतरी प्रश्न प्रलंबित आहेत. यापूर्वीच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सहविचार सभेचे आयोजन करून शिक्षकांशी चर्चा केली असती तर यातील अनेक प्रश्न मार्च अखेरीस सुटले असते. शैक्षणिक वर्ष चालवत असताना त्यामध्ये शिक्षक संघटनांचाही ही वाटा तेवढाच महत्त्वाचा असतो.
शिक्षकांचे प्रश्न तसेच प्रलंबित कामे कार्यालयात गेली पाच वर्षे तशीच पडून आहेत आणि त्यावर कार्यालयाकडून वेळोवेळी आणि सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.दिवसेन दिवस फाईल गहाळ होण्याचे प्रकार वाढतच आहेत.
याचा विचार करून लवकरात लवकर दि.-28/3/22 पर्यंत सहविचार सभेचे आयोजन करावे व मागील सभेचे इतिवृत्त पाठवावे अन्यथा नाईलाजास्तव बुधवार दिनांक 30/3/2022 रोजी दुपारी 3.30 वाजता लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन

 


सहविचार सभेचे आयोजन करण्यात यावे याकरिता तिसरे लेखी निवेदन देताना शिक्षक भारतीचे पदाधिकारी

प्रतिक्रिया व्यक्त करा