You are currently viewing दुर्गंधी व मशिनरीच्या आवाजामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात –  सुधीर आडिवरेकर

दुर्गंधी व मशिनरीच्या आवाजामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात –  सुधीर आडिवरेकर

एप्रिल महिन्याच्या आत प्रकल्प अन्यत्र हलविण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

सावंतवाडी

नगरपरिषदेच्यावतीने मच्छीमार्केट मध्ये सुरू असलेल्या टाकाऊ मच्छीपासून खत निर्मिती प्रकल्पामुळे दुर्गंधीमुळे व मशिनरीच्या कर्कश आवाजामुळे परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याबाबत आज नागरिकांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत व्यथा मांडल्या तर माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी हा प्रकल्प शहराच्या बाहेर स्थलांतरीत करावा अशी मागणी केली यावेळी यावेळी एप्रिल महिन्याच्या आत हा प्रकल्प अन्यत्र हलविण्यात येईल असे आश्वासन जावडेकर यांनी दिले.

यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेवक उदय नाईक, डॉ. प्रसाद नार्वेकर यांसह मच्छी मार्केट परिसरातील नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा