You are currently viewing अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्यात शेती बागायतीचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्यात शेती बागायतीचे मोठे नुकसान

दोडामार्ग

गेल्या चार पाच दिवसांपासून उकाड्याने नागरीक हैराण झाले आहेत.त्यातच कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेले वादळ यामुळे काही ठिकाणी हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असा इशारा दिला असताना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या अवकाळी वादळी पावसाने पडवे मोरगांव आडाळी कळणे परिसराला झोडपून काढले.

पडवे येथे या वादळाचा काजू झाडे आंबा झाडे मोडून मोठे नुकसान झाले तर या ठिकाणी काजू बागायती मधून गेलेले दोन वीजेचे खांब देखील आडवे झाले सुदैवाने काजू बागायती मध्ये काजू गोळा करायला आलेल्या महिला बालबाल बचावल्या. दोडामार्ग तालुक्यातील काही गावात ढगांच्या गडगडाट वादळी वाऱ्यासह पावसाने सायंकाळी हजेरी लावली.बुधवारी सकाळ पासून आकाशात ढगाळ वातावरण होते मळब दाटून आले होते. उष्णतेचा पारा चढला होता अंगाची लाही लाही होत होती.बाहेर पडणे अवघड झाले होते.

दोडामार्ग बांदा मार्गावर असलेल्या पडवे, मोरगांव, आडाळी, येथे सायंकाळी साडेपाच वाजता मोठा आवाज करत घोंगावत आलेल्या वादळी पावसाने पडवे येथील माळ रानावर देसाई कुटुंबिय यांनी प्रंचड मेहनत करून निर्माण केलेल्या काजू बागायती मधिल झाडे तसेच आंबा झाडे मोडून जमिनीवर पडली पडून मोठे नुकसान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा