You are currently viewing खारेपाटण चेकपोस्ट येथे कंटेनरला अपघात; दोघांचा मृत्यू

खारेपाटण चेकपोस्ट येथे कंटेनरला अपघात; दोघांचा मृत्यू

खारेपाटण चेकपोस्ट नाक्याचे समोर सुकी नदीच्या पुलावरून भारत बेंज कंपनीचा कंटेनर MH47-AS2266 मंगळवारी 22 मार्च रोजी नदीत कोसळून अपघातात दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री 11.20 सुमारास घडला.

हा कंटेनर कणकवली कडून रत्नागिरीकडे जात असताना सुकी नदीच्या पुलावरून 80 फूट खाली कोसळला. खारेपाटण चेकपोस्टवरील पोलीस अंमलदार उद्धव साबळे, वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी मदती करिता धाव घेतली. नदीमध्ये पाण्याचा प्रवाह असल्यामुळे मदत कार्यास अडथळा येत होता. तरीदेखील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तात्काळ उपचाराकरिता खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. परंतु तत्पूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासात आढळून आले. सदर ठिकाणी डीवायएसपी विनोद कांबळे कणकवली यांनी भेट घेऊन अपघातग्रस्त ठिकाणांची पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा