आरोंदा गावात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांच्या टोळ्या एकट्या दुकट्या माणसाचा, बाईकस्वाराचा लांब अंतरापर्यंत जीवघेणा पाठलाग करतात. वाहन चालकांच्या मागे धावल्या मुळे वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. तसेच हि मोकाट कुत्री कळपाने फिरत असल्याने पादचाऱ्यांना धोकादायक झाले आहे. तसेच चालत ये जा करणाऱ्या माणसांच्या ही मागे लागतात. त्याचा चावा हि घेतात. त्यामुळे नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार घडत असल्याने घबराट वाढली आहे. ह्या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आरोंंदा मधिल नागरीकांचि मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
आरोंद्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
- Post published:मार्च 23, 2022
- Post category:बातम्या / विशेष / सावंतवाडी
- Post comments:0 Comments