You are currently viewing रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली संगीताच्या तालावर

रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली संगीताच्या तालावर

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरात संगीताच्या तालावर थिरकत विविध
रंगांची उधळण करत
रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळपासूनच चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.यामध्ये दुपारनंतर अवघ्या तरुणाईची भर पडून
रंगांमध्ये चिंब भिजत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटण्यात आला.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी व शासनाच्या निर्बंधांमुळे रंगपंचमी साजरी करण्यावर कमालीची मर्यादा आली होती.पण , यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्याने योग्य ती खबरदारी घेवून इचलकरंजी शहरात चिमुकल्यांसह अवघ्या तरुणाईने संगीताच्या तालावर थिरकत व विविध रंगांची उधळण करत अगदी उत्साहात रंगपंचमी साजरी केली.यामध्ये युवती व महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.सकाळपासूनच शहरातील प्रत्येक गल्ली – बोळात चिमुकल्यांनी एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला.यामध्ये दुपारनंतर अवघी तरुणाई सहभागी होवून रंगांची उधळण व एकमेकांना रंग लावण्यात मग्न झाली होती.विशेष म्हणजे बहुतांश ठिकाणी पाण्याचे कारंजे बसवून त्या पाण्याखाली संगीताच्या तालावर तरुणाईची पावले थिरकत राहिल्याने रंगपंचमीच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.या पार्श्र्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यावर व अन्य ठिकाणी रंगासह पिचकारी व अन्य साहित्य विक्रीचे स्टाॅल लावण्यात आले होते.याठिकाणी चिमुकल्यांसह तरुणाईची खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत होती.
शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी सामुहिकरित्या रंगपंचमी साजरी करणे पसंद केल्याचे दिसून आले.त्यामुळे एकमेकांना रंग लावत आणि संगीताच्या तालावर थिरकणारी चिमुकल्यांसह अवघी तरुणाई आनंदाच्या उत्साहाला उधाण आणणारी दिसून आली.ब-याच ठिकाणी तरुणाई समुहाने
मोटारसायकल चालवत आपल्या मिञमंडळींसह ओळखीच्या नागरिकांना रंग लावत रंगपंचमीच्या शुभेच्छा देत होती.तर काही ठिकाणी स्टेरिओ लावून संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई रंगपंचमीच्या उत्साहात अधिक भर घालणारी ठरली.दरम्यान , रंगपंचमीच्या पार्श्र्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये , यासाठी शहरातील विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा