You are currently viewing डेगवे गावचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न…!

डेगवे गावचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न…!

बांदा

कोकणातील प्रत्येक गावा- गावातील शिमगोत्सवाची परंपरा वेग- वेगळीअसते. सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात आंबेखणवाडी,फणसवाडी,जांभळवाडी, मोयझरवाडी, बाजारवाडी,व श्रीराम मंदिर,श्री स्थापेश्वर मंदिर व श्री माऊली मंदिर अशा ठिक-ठिकाणी सार्वजनिक होळी पौर्णिमे दिवशी घालतात.माऊली पंचायतन देवतेकडे सर्वात मोठी म्हणजे ४० -४५ फुट होळी घालतात.त्यानंतर ब्राह्मणांच्या मंत्र घोषात विधिवत पुजा केली जाते.नंतर होळीला प्रत्येक घरातून नारळ अर्पण करतात.व गावच्या व कुंटूबाच्या हितासाठी गाव गाराणे घालतात.


दुसऱ्या दिवशी रात्री वाडी निहाय प्रत्येक घरी देवाचे निशाण घेऊन “नौबत”केली जाते.ती झाल्यावर रात्री वाडीनिहाय “रोबांट” घालत ग्रामदेवता श्री माऊलीच्या होळीकडे सर्वजण एकत्र जमतात.तेथे गावहिताचे गाराणे करून सर्व निशाण घेऊन स्थापेश्वराच्या मंदिराच्या होळीकडे वाजत गाजत जातात.तेथे गावहिताचे गाराणे घालतात.
होळीच्या ५व्या दिवशी सर्व निशाण माऊली मंदिर होळीच्या ठिकाणी एकत्र जमा होतात.त्या सर्व निशाणाची विधिवत पुजा केल्यानंतर वाडीनिहाय निशाण प्रत्येक घरी “तळी”साठी जातात.प्रत्येक घरी त्याचे आदराने स्वागत केले जाते.नंतर सर्व निशाण जांभळवाडी येथे “मांडावर” एकत्र येतात.संध्याकाळी ४वाजता “रोबांट” सुरु होते.धुलीवंदनाच्या दिवशी विविध रंगाच्या रंगानी न्हाऊन निघालेल्या लहानमुलां पासून ते आजच्या तरुण.मंडळी व ज्येष्ठापर्यत सारेजण देहभान विसरून नाचायला लागतात.हे पहायला महिला,मुले अग्रभागी असतात.
सर्व जण वाजत-गाजत,नाचत एक ताल सुरात गावाच्या “एकात्मतेचे प्रत्येक ठरणाऱ्या” होळीचा आनंद पावलो,पावली दिसून येतो.श्री स्थापेश्वर मंदिराकडून माऊली मंदिर पर्यंत हे “रोबांट” रात्रीपर्यंत असते.तेथे गावहिताचे गाराणे घालून “धुळ” मारली जाते.
दुसऱ्या दिवशी “न्हावनान”अर्थात ” तिर्थाने” होँळीच्या धुलीवंदनाच्या ५ दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते.

उल्हास देसाई.
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा