इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाकडून कचरा उघड्यावर टाकणा-यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.तर दुसरीकडे याच प्रशासनाकडून शहरातील विविध ठिकाणी
साठलेला कचरा उठाव करण्यात होत असलेल्यामुळे दिरंगाईमुळे मोठी दुर्गंधी पसरली आहे.हीच गंभीर परिस्थिती शहरात साथीचे आजार फैलावून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण करणारी ठरु लागली आहे.याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास नागरिकांना सोबत घेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संयुक्त लिंबू चौकचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव यांनी पञकारांशी बोलताना दिला.
इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने माझी वसुंधरा योजनेतंर्गत शहरातील मुलभूत विकास कामांवर भर देतानाच कर वसुलीसाठी मोठी कंबर कसली आहे.तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून पालिका प्रशासनाकडून
कचरा उघड्यावर टाकणा-यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.तर दुसरीकडे याच प्रशासनाकडून शहरातील चौकाचौकात
साठलेला कचरा उठाव करण्यात दिरंगाई होत असल्याचे आता लपून राहिलेले नाही.परिणामी , ठिकठिकाणी कच-याचे मोठ्या प्रमाणात ढिग साचून मोठी दुर्गंधी पसरुन साथीचे आजार फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे
नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होण्याची टांगती तलवार देखील फिरु लागली आहे.याचे गांभीर्य लक्षात घेवून पालिका प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी.अन्यथा शहरातील नागरिकांना सोबत घेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संयुक्त लिंबू चौकचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव यांनी पञकारांशी बोलताना दिला.
यावेळी दिलीप नंदनवाडे,दत्ता यादव ,इराण्णा सुतार , जोतिबा कोपार्डे , अनिल कोपार्डे यांच्यासह अन्य नागरीक उपस्थित होते.