*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.निलांबरी गानू यांची अप्रतिम काव्यरचना*
*उन्मेष*
(होळी पुनवेला)
वाटते सखी होळी पुनवेला निघावे
उन्मेश यौवनाचे संगे तुझ्या लुटावे
तू दूर दूर गावी अध्यापनात गुंगझ
विरही मनात माझ्या विरही व्यथा तरंग
तव संगतीत यावे रंगात धुंद व्हावे
उन्मेष यौवनाचे संगे तुझ्या लुटावे
श्रावण भादव गेला या एकटेपणात
द्यावा विराम येथे येई असे मनात
सहजीवनी रंगावे रंगात गुंग व्हावे
उन्मेष यौवनाचे संगे तुझ्या लुटावे
सुट्टीत भेटताना यावा सखे वळीव
वर्षाव सरींचा सृष्टी करील सजीव
त्या तृप्त मेदिनीच्या सौख्यास का मुकावे
उन्मेष यौवनाचे संगे तुझ्या लुटावे
वेगे वसंत सारा जाईल ओसरून
धनही समर्थ नाही तो द्यावया फिरून
वेळीच आवरूनी चित्तास तू धरावे
उन्मेष यौवनाचे संगे तुझ्या लुटावे
डॉ निलांबरी गानू
राजगुरुनगर पुणे