You are currently viewing कृष्ण नाम घेता रंगांचे उठती तरंग

कृष्ण नाम घेता रंगांचे उठती तरंग

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी, संगीतकार, गायक श्री अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना

कृष्ण नाम घेता रंगांचे उठती तरंग
राधा-कृष्ण गोपी भासती नृत्यात दंग।।ध्रु।।

काम धाम विसरुनी वाटे उत्साह उमंग
षड्रिपु न राहे खेळता नवरस रंग
श्याम मुरारीचे जाणिवेनं होती दंग।।1।।

रंगाची उधळण करीत नाचे पांडुरंग
संगीत शब्द ताल बदलती अंतरंग
भेदा-भेद नुरे खेळता होळीचे रंग।।2।।

सण उत्सव प्रसंगापरी भरतो रंग
वारी गणपती नवरात्री आनंद तरंग
अवघा बने एक रंग,रंगी रंगे श्रीरंग।।3।।

काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत, रायगड.
पिन 410 201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा