जागतिक साहीत्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना
काय महती सांगावी स्त्री जन्मा मी तुझी
महिला नव्हे जगत जननी तू सखी माझी
सोसुनी अनंत कळा जन्मा घालते बाळा
दुडूदुडू धावता पायी बांधते घुंगुर वाळा
भगिनी बनुनी प्रिय रक्षणा मनगटी धागा
रीत अनोखी नात्याची दर्शवी असेच वागा
पत्नी म्हणोनि येताची संसारसुख ती देते
सर्वस्व अर्पूनी राज्ञी पती हेचि सुख मानते
छातीवर ठेवुनी डोकं लेक बापास भेटते
‘दिल्या घरी सुखी रहा’ कन्या संसार थाटते
नारी नाही अबला, सबला होऊनी लढते
अन्यायाच्या विरोधात ती दुर्गा काली बनते
सोशिकता हा गुणधर्म तिच्यावर पडतो भारी
बनुनी महिषासुरमर्दिनी स्त्री दुष्टांस संहारी
मुलगी येता जन्मास का स्त्रीला दोष देता
मुलगा मुलगी जन्मन्या जबाबदार असे पिता
कुणी अहिल्या कुणी इंदिरा कुणी ताराराणी
सावित्रीची लेक जन्मता गाऊ गोडवे गाणी
©【दिपी】🖋️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग..८४४६७४३१९६