पुढील विषयांवर चर्चा
1)पदवीधर, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदोन्नती बाबत…
यावर चर्चा झाली असता संघटनेने यापूर्वी मागणी केल्या प्रमाणे B.Sc.B.Ed. धारक 11 शिक्षकां ची पदोन्नती ची मंजुरी अंतिम टप्प्यात असून लवकरच पदोन्नती दिली जाईल
2) अप्रशिक्षित शिक्षकांचा वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत…
ह्या प्रश्नावर राज्य शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.(यासाठी यानंतर शिक्षक भारतीने 12 वर्षानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्यासाठी राज्यस्तरावर आमदार कपिल पाटील यांच्यामार्फत प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.)
3)निमशिक्षकांची नियुक्ती शासन निर्णया च्या दिनांकापासून करणे
याबाबत चर्चा झाली असता जर मार्च 2014 ला जिल्ह्यात उपशिक्षक यांची रिक्त पदे असतील तर त्या दिनांकापासून नियुक्ती दिली जाईल, असे आश्वासन दिले. यासाठी संबंधित वर्षाची संच मान्यते चा आढावा घेतला जाईल.
4) माध्यमिककडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या शिक्षकांबद्दल…
याबाबत सदर शिक्षकांचे पीएफ, DCPS, वेतन आयोग फरक यामध्ये झालेल्या अडचणी संघटनेने निदर्शनास आणून दिल्या
याबाबत शिक्षण उपसचिव यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
5) अंशदान योजनेतील तफावती तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांच्या DCPS कपातीबाबत
यासाठी संघटनेच्या वारंवार पाठपुराव्यामुळे मान.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी समिती गठित केली असून हा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे*
6) शाळांची वीजबिले भरण्याबाबत
शिक्षक भारती संघटनेने हा विषय गेली 3 वर्षे वारंवार घेतला असून याला सकारात्मक प्रतिसाद शिक्षण विभागाकडून मिळाला असून, त्यानुसार मोठ्या शाळांना सुमारे 10000 रुपये व लहान शाळांना सुमारे 5000 रुपये जिल्हा परिषदेकडून वीजबिल भरण्यासाठी मिळणार असून यापैकी 50%रक्कम शाळांना लवकरच वर्ग करण्यात येणार आहे.
7) सन 2001 व 2002 मध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांची सहाव्या वेतन आयोगाची सदोष वेतन निश्चती बाबत…
हा विषय फक्त शिक्षक भारती संघटनेने गेली 2 वर्षे लावून धरला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून दोडामार्ग तालुक्यातील 15 शिक्षकांचे दुरुस्ती प्रस्ताव कार्यालय कडे प्राप्त असून इतर तालुक्यांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी सर्व गट शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात येईल व यानंतर वेतन दुरुस्ती केली जाईल
8) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावाबाबत…
डिसेंबर 2019 पर्यंत 12 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव कार्यालयाला प्राप्त झाले असून त्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच त्यापुढील शिक्षकांचे प्रस्ताव मागविण्या साठी लवकरच पत्र काढले जाईल.
तसेच वेंगुर्ला तालुक्यातील शिक्षकांना 1 वर्ष झाले तरी वरिष्ठ वेतन श्रेणी लाभ मिळाला नाही. हा लाभ त्वरित देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात येतील,असे सांगण्यात आले.
9) राष्ट्रयिकृत बँकेतील शाळांच्या खात्यात झीरो balace ठेवण्याबाबत…
बऱ्याच बँकामध्ये शाळेच्या खात्यातून मिनीमम balace चार्ज आकारला जातो, याबाबत संघटनेने लक्ष वेधले.
याबाबत अग्रणी बँक यांच्या सभेमध्ये हा विषय ठेवून याबाबत सदर बँकांकडे पत्रव्यवहार केला जाईल
10) स्थायी आदेश बाबत….
हा विषय प्रलंबित असल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली असता, याबाबत पडताळणी सुरू असून हा विषय अंतिम टप्प्यात आहे,असे सांगण्यात आले.
तसेच आंतरजिल्हा बदली होवून आलेल्या शिक्षकांचे स्थायी आदेश याबाबतची अडचण निदर्शनास आणली गेली. सदर शिक्षकांना पूर्वी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेची NOC आणण्याऐवजी संबंधित शिक्षक यांच्याकडून स्व घोषणापत्र घेणे व गटशिक्षणािकारी यांचे पत्र घेवून त्यांचे प्रस्ताव मंजूर करावे अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला
11) मेडिकल बिलांबाबत
तालुक्या कडून परिपूर्ण प्रस्ताव न आल्याने मेडिकल बिलांमध्ये वारंवार त्रुटी काढल्या जातात. त्यामुळे उशीर होतो व शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी तालुक्यातून परिपूर्ण प्रस्ताव पाठवावे अशी मागणी करण्यात आली.
12) बंद शाळांतील शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत..
संच मान्यता झाल्यावरच जिल्ह्यातील 32 शिक्षकांचे समायोजन केले जाईल, असे स्पष्ट केले.
13) दरमहा पगार पत्रक मिळण्याबाबत…
याबाबत तालुका कार्यालय यांना सूचना दिल्या जातील.
14) महत्त्वाची शासन परिपत्रके छापील स्वरूपात मिळण्याबाबत…
याबाबतची सूचना केंद्रप्रमुख यांना दिल्या जातील
15) लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या शिक्षकांचा जून 2020 चा पगार अदा करण्याबाबत…
याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार गटशिक्षणाधिका री यांना असून याबाबत तालुका स्तरावर पाठपुरावा करावा,असे सांगण्यात आले
16) ऑनलाईन व*ऑफलाईन शिक्षण बाबत
जिल्ह्यातील सर्व शिक्षक यांनी शासन निर्देश नुसार विद्यार्थी यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्या शिक्षणासाठी योजना तयार करावी, यासाठी विविध अँप, शिक्षक मित्र यांची मदत घ्यावी. तसेच जिल्ह्याबाहेर असलेल्या शिक्षकांनी त्वरित जिल्ह्यात हजर व्हावे अशी सूचना देण्यात आली.
17) आंतरजिल्हा कार्यमुक्त बाबत…
10 टक्के पेक्षा जास्त पदे जिल्ह्यात रिक्त असल्याने आंतरजिल्हा बदली कार्यमुक्तता होण्यास अडथळे असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी 5 ऑक्टोबर रोजी या प्रश्नासाठी धरणे आंदोलन करण्याचा पुनरुच्चार संघटनेमार्फत करण्यात आला.
या भेटीच्या वेळी शिक्षणाधिकारी मान. आंबोकर साहेब, उपशिक्षणाधिकारी आंगणे, कक्ष अधिकारी पिंगुळकर, डोईफोडे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, जिल्हा सचिव अरुण पवार,राज्य संघटक किसन दुखंडे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष वसंत गर्कल, सचिव तानाजी शिंगाडे, दोडामार्ग सचिव सखाराम झोरे, मालवण तालुकाध्यक्ष संतोष कोचरेकर उपस्थित होते