दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गौरव; मान्यवरांची उपस्थिती…
सावंतवाडी
मोती तलावाच्या काठी केशवसुत कट्ट्यांवर सामाजिक बांधिलकीच्या वतीने आयोजित “सुंदरवाडी कवी संमेलनात” ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तसेच त्यांनी केलेल्या सेवेबद्दल जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर व लेखक डॉ. जी. ए. बुवा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तर प्रा. शैलेश नाईक यांनी सन्मानपत्र वाचन केले. कविवर्य केशवसुत यांच्या १५६ व्या जयंती दिनानिमित्त या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जी.ए.बुवा, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, अनिल परूळेकर , विलास जाधव, सुरेश भोगटे,सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव, संजय पेडणेकर, प्रा.शैलेश नाईक, प्रा.सतीश बागवे, ॲड. अशोक पेडणेकर, शुभांगी सुकी, श्रीमती जयश्री पेडणेकर, कवयित्री उषाताई परब, कल्पना बांदेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मालवणी कवी दादा मडकईकर, प्रा.रुपेश पाटील, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, विठ्ठल कदम, किशोर वालावलकर, मनोहर परब, पत्रकार सीताराम गावडे, भूषण आरोसकर, मंगल नाईक-जोशी, वाय.पी.नाईक, विनायक गांवस, ऋतुजा सावंत-भोसले, प्रकाश तेंडोलकर, मृण्मयी पोकळे, स्वप्ना गोवेकर, प्रा.ॲड.अरुण पणदुरकर, प्रज्ञा मातोंडकर, बी.जी.बोर्डे, सौम्या गोवेकर, एकनाथ कांबळे, अनिल कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी,डॉ. मधुकर घारपुरे, प्रा.केदार म्हसकर, प्रदीप ढोरे, सुधीर धुमे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, पत्रकार राजेश मोंडकर, प्रा. तुषार वेंगुर्लेकर, इफ्तेकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस,अर्षद बेग, पत्रकार हरिश्चंद्र पवार,उमेश सावंत, राजू तावडे,,अभय पंडित,अमोल टेमकर, साबाजी परब, शुभम धुरी, रोहन गावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.