You are currently viewing आंबोली घाट…गुन्हेगारीचा अड्डा…

आंबोली घाट…गुन्हेगारीचा अड्डा…

क्राईम स्टोरी इथेच येऊन थांबते.

महिन्याभरापूर्वी आंबोली घाटात खोल दरीत एका महिलेचा मृतदेह असल्याचं सांगली येथील पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं होतं. आंबोली व सावंतवाडी पोलिसांनी मृतदेह वर काढून तपास सुरू केला होता, परंतु छिन्नविच्छिन्न व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटली नव्हती. कोल्हापूर व सावंतवाडीतील बेपत्ता महिल्यांच्या नातेवाईकांनी देखील ओळख पटविली नव्हती. ही महिला सावंतवाडी तालुक्यातील बेपत्ता महिलाच असल्याचे समोर आले होते.
आंबोली घाटात, कावळेसाद येथील दरीत यापूर्वी देखील बरेच मृतदेह, सांगाडे भेटले होते. त्यामुळे आंबोली येथील घाट परिसर आणि कावळेसाद पर्यटन स्पॉट हे गुन्हेगारीचे हॉटस्पॉट बनले आहेत. गडहिंग्लज येथील अनैतिक संबंधातून झालेली हत्या असो वा नशेत स्वतःला चॅलेंज म्हणून झोकून दिलेले युवक असोत, अशा अनैतिक संबंधातून झालेल्या हत्या असो वा इतर कारणांनी झालेले खून. आंबोली हा परिसर रात्रीच्यावेळी अशा गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना सोयीस्कर ठरतो. कोल्हापूर, सांगली घाटमाथ्यावरील काहींच्या हत्या करून इथेच त्यांची विल्हेवाट लावली गेल्याचे गेली काही वर्षे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गातील काही खून सुद्धा आंबोलीच्या दरीत लपविले गेल्याचे आढळून येत आहे.
महिन्याभरापूर्वी मिळालेल्या महिलेचा सुद्धा घातपात झाल्याचा संशय होता. ही महिला सावंतवाडीच्या आजूबाजूच्या युवकांसोबत फिरायला गेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. तिचा घातपात केल्याच्या संशयावरून दोन अल्पवयीन युवकांसोबतच कोलगाव येथील योगेश उर्फ लक्षण रवींद्र आडणेकर, माजगाव येथील योगेश कांबळे अशा चौघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले.
या तपासात पो.नि. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी श्री गोते, नवनाथ शिंदे, शरद लोहकरे, सतीश कविटकर, प्रसाद कदम, भूषण भोवर यांनी काम पाहिले. ही महिला त्या युवकांसोबत फिरायला गेली होती परंतु त्या ठिकाणी नेमके काय झाले? याबद्दल पुढील तपासात माहिती होईल..

क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 4 =