सावंतवाडी
येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ दीपक नेवगी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्येष्ठ कायदेतज्ञ म्हणून त्यांची ओळख होती.
सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले होते. प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख होती. सावंतवाडी बार असोसिएशनचे सुद्धा काही काळ ते अध्यक्ष होते.