You are currently viewing जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा बांदा नं. 1 या प्रशालेत महिला शिक्षिकांसाठी शोध सुगरणीचा पाककला स्पर्धा संपन्न

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा बांदा नं. 1 या प्रशालेत महिला शिक्षिकांसाठी शोध सुगरणीचा पाककला स्पर्धा संपन्न

बांदा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सुलभाताईंच्या जयंतीनिमित्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सावंतवाडीच्या वतीने जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा बांदा नं. 1 या प्रशालेत सावंतवाडी तालुक्यातील समस्त महिला शिक्षिकांसाठी शोध सुगरणीचा ही भव्य पाककला स्पर्धा तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती श्वेता कोरगावकर मॅडम , पंचायत समिती उपसभापती श्री शीतल राऊळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भुमिका योग्य पध्दतीने बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून विविध रूपात पुरूषांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहणा-या स्त्री शक्तीचा सन्मानच होता.


यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून भव्यदिव्य अशा सोहळ्याला सुरुवात झाली.
महिला सर्व भुमिका निभावत असताना त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांचे कौतुक तसेच सर्व सहभागी झालेल्या स्पर्धकांचे अभिनंदन करून जि.प.सदस्या श्वेता कोरगावकर मॅडम यानी शुभेच्छा दिल्या .महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महिलांना शुभेच्छा देऊन जि.प.सदस्य श्री. शितल राऊळ यांनी राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुकही केले.या वेळी उपसभापती श्री.शितल राऊळ,जि.प.सदस्य श्वेता कोरगावकर या मान्यवरांनी महिला मेळाव्याच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत आर्थिक मदत देऊन जणु शाबासकीची थापच दिली.महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच समाजाभिमुख राहुन वेळोवेळी समाजिक बांधिलकी जपत अभिमानास्पद अशा गौरवशाली उपक्रमांचे आयोजन करते.यामुळे सामाजिक स्तरावर कौतुकही होत आहे. पाककला स्पर्धेमध्ये एकुण साठ स्पर्धकांनी वेगवेगळ्या पाककृती सादर करून कार्यक्रम आणखीनच स्वादिष्ट बनवला.तर समूहगीत स्पर्धेमध्ये सावंतवाडी तालुक्यातील दहा केंद्रानी सहभाग नोंदवुन सुमधूर देशभक्तीपर गीत गायनाने सारे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.तर तेजस्वीता वेंगुर्लेकर, सिमा पंडित, श्रावणी सावंत, मृगाली पालव यानी आकर्षक रांगोळी काढून वातावरण निर्मिती केली.तर कवी मनोहर परब यानी सुलभाताईंची रांगोळी काढून सर्वांसाठी लक्षवेधी ठरली.
शाकाहारी पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक-चैताली गवस,द्वितीय क्रमांक-श्रेया परब,तृतीय क्रमांक-सीमा मोरजकर, तर उत्तेजनार्थ-जयश्री पेडणेकर, शामल कळसुलकर, सृष्टी पाटील. मांसाहारी पदार्थांमधून प्रथम क्रमांक -ऐश्वर्या सावंत ,द्वितीय क्रमांक-सरोज नाईक, तृतीय क्रमांक-राधिका परब,तर देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक-मळेवाड केंद्र, द्वितीय क्रमांक-माडखोल केंद्र, तृतीय क्रमांक-माजगाव केंद्र, सर्व विजयी स्पर्धकांना चषक, मेडल देऊन सहभागी स्पर्धकांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.बांदा केंद्रातील शिक्षकांनी सुमधूर आवाजात ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले.पाककला स्पर्धेसाठी परीक्षक सौ.सुनीता नाईक, सौ.ज्योती सावंत तर समूहगीत स्पर्धेसाठी परीक्षक श्री.चंद्रकांत सावंत यांनी काम पाहिले.यावेळी राज्य संयुक्त चिटणीस म.ल.देसाई,जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,संतोष गवस,मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर ,जिल्हा महिलाप्रमुख श्रावणी सावंत,मृगाली पालव,महिला तालुका अध्यक्ष वंदना सावंत,सचिव,तेजस्विता वेंगुर्लेकर,सरोज नाईक,स्वाती नाईक,ज्योती शिरोडकर,केंद्रप्रमुख संदिप गवस,कें.प्र नरेंद्र सावंत,कें.प्र.रामा गावडे,तालूका अध्यक्ष संजय शेडगे ,सचिव अमोल पाटिल,माजी अध्यक्ष पुषोत्तम शेणई,माजी सचिव गुरूनाथ राऊळ,दिपक राऊळ,महेश सावंत,मनोहर गवस,मनोहर परब,नितीन सावंत,नीता सावंत,रोशन राऊत,राहूल वाघधरे,विजय गावडे,विजय खरात,घोगरे,आत्राम,संतोष रावण ,महेश पालव,अनुराधा धामापूरकर,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन महिला सेल अध्यक्षा वंदना सावंत हिने कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली.कार्यक्रमाचे प्रस्तावित श्रावणी सावंत हिने केले तर आभार महिला सेल सचिव तेजस्विता वेंगुर्लेकर हिने मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =