You are currently viewing सावंतवाडी भंडारी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी जगदीश मांजरेकर…

सावंतवाडी भंडारी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी जगदीश मांजरेकर…

सावंतवाडी

तालुका भंडारी समाज मंडळाच्या अध्यक्षपदी जगदीश मांजरेकर यांची निवड झाली आहे. तर कार्याध्यक्ष पदी प्राध्यापक दिलीप गोडकर, उपाध्यक्ष पदी गुरुनाथ पेडणेकर, देविदास आडारकर, दत्तप्रसाद अरविंदेकर, शांताराम आकेरकर, सचिव पदी दिलीप पेडणेकर, सहसचिव पदी नामदेव साटेलकर आणि खजिनदार पदी चंद्रकांत वाडकर यांची एक मताने निवड करण्यात आली.

मंडळाची सर्व साधारण सभा नुकतीच संपन्न झाली. त्यात २१ सदस्यांची कार्यकारणीं आणि ८ सदस्यांची सल्लागार कमिटीची निवड करण्यात आली. तर या सभेत यावर्षी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. त्यात विध्यार्थी गुण गौरव समारंभ, वधू – वर मेळावा, मंडळाचे कॅलेंडर, महिलांसाठी पाक कला कार्यशाळा, युवकांसाठी इंटर तालुका भंडारी मंडळ ज़िल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. तर शुक्रवार दि.१५ एप्रिलला या वर्षीचा पहिला उपक्रम म्हणून वधू वर मेळावा आयोजित करण्याचे ठरले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + fifteen =