You are currently viewing शिरवल प्रीमियर लिग स्पर्धेतुन उदयोन्मुख खेळाडू घडतील-आबा सावंत

शिरवल प्रीमियर लिग स्पर्धेतुन उदयोन्मुख खेळाडू घडतील-आबा सावंत

कणकवली

शिरवल सारख्या ग्रामीण भागात प्राणजीवन सहयोग संस्थेने,शिरवल गाव मर्यादित प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतुन उदयोन्मुख खेळाडूंना क्रिकेटचे एक चांगले व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या स्पर्धेतुन निश्चितच उदयोन्मुख खेळाडू घडतील असे प्रतिपादन शिरवल गावचे मानकरी नितेश उर्फ आबा सावंत यांनी केले.

ते शिरवल खासकीलवाडी येथे प्राणजीवन सहयोग संस्था पुरस्कृत शिरवल प्रिमियर क्रिकेट लिग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी स्पर्धेचे शुभारंभ ज्येष्ठ ग्रामस्थ लवू राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन आबा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर अमोल सावंत,भिकाजी सावंत, प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर, पोलस पाटील विजय शिरवलकर,दत्ताराम पेंडूरकर, माजी सरपंच मनोज राणे, दिगंबर पांचाळ, राजेश शिरवलकर,अनिप सावंत, श्रीकृष्ण यादव, प्रवीण तांबे, मंगेश शिरवलकर,सुनील कुडतरकर,पांडुरंग राणे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आबा सावंत म्हणाले कि प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक,सामाजिक,कला,क्रीडा,सांस्कृतिक, आरोग्य विषयक अशा विविध उपक्रमांचे आयोजन प्राणजीवन सहयोग
संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.त्यांचे हे उपक्रम कौतुकास्पद आहे.असे सावंत म्हणाले.

यावेळी प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने शिरवल प्रीमयर लीग च्या टीशर्ट चे अनावर मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंना करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा