कणकवली
संपूर्ण जिल्ह्यामध्ये नागरिकांना येत असलेला अनुभव, प्रशासकीयअधिकारी/कर्मचारी, यांचेकडून विविध कारणास्तव होणारी जाणीवपूर्वक( भ्रष्टाचार युक्त) दप्तर- दिरंगाई? यामुळे संबंधित अर्जदार, नागरिकांना, होणारा नाहक त्रास व मनस्ताप, तसेच शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहणाऱ्या जिल्ह्यातील सजग लाभार्थी नागरिकांच्या, न्याय हक्का करिता, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय कणकवली बाजारपेठ नागरिकांचा धडक मोर्चा शुक्रवारी 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निघणार आहे.
या धडक कार्याची सुरुवात कणकवलीतून सुरू होणार आहे! या ” धडाडीच्या शुभ कार्यास ” कणकवलीकर नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती सिंधुदुर्गचे ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांनी केली आहे