नवाब मलिक च्या राजीनाम्यासाठी विधान भवनावर मोर्चा
मुंबई
नवाब मलिक यांच्या राजीनाम्या च्या मागणीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान ते विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार,,आशिष शेलार, गिरीश महाजन, नितेश राणे नेते तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्या राणे समर्थक तथा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ. वैशालीताई राणे यांनी सुद्धा सहभाग घेतला होता.